Breaking News

सात सिंचन प्रकल्प प्रस्तावांना मान्यता; 84 हजार हेक्टर जमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सिंचनाखाली येणारमुंबई,दि.8 : राज्यातील सात सिंचन प्रकल्पांच्या प्रस्तावांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 84 हजार हेक्टर जमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सिंचनाखाली येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या विभागाअंतर्गत येणार्‍या सिंचन प्रकल्प प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) प्रस्तावांना मान्यता देण्याचे ठरले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वांग मध्यम प्रकल्पामुळे एकूण 6200 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर कालव्याद्वारे हरणबारी धरणाचे पूर पाण्याने पाझर तलाव, को.प. बंधारे, ल.पा. तलावांचे 50% क्षमतेने पुनर्भरण करण्याचे नियोजन असून याद्वारे बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यातील एकूण 16 गावातील 495 हे. क्षेत्रास सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 304 कोटी 4 लाख आहे.नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचे पूर पाणी तळवडे भामेर लघु पाटबंधारे तलावात सोडल्यामुळे बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यातील एकूण 16 गावातील 495 हे. क्षेत्रास सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 33 कोटी 35 लाख आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातील डाव्या कालव्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. या कालव्याद्वारे तलावांचे 50% क्षमतेने पुनर्भरण करण्याचे नियोजन असून याद्वारे बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यातील एकूण 10 गावातील 246 हे. क्षेत्रास सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 62 कोटी 60 लाख आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सिनामाढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र सिंचनाखाली आणणे नियोजित असून प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील 40 गावातील 16150 हे. क्षेत्राला प्रवाही पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 623 कोटी 6 लाख आहे. सातारा जिल्ह्यातील जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील खटाव तालुक्यातील 11700 हे. व माण तालुक्यातील 15800 हे. असे एकूण 27500 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 1085 कोटी 54 लाख आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा शिंगोली ही योजना पूर्ण झालेली असून या योजनेमूळे 357 हे. इतक्या जमिनीस सिंचनाचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 128 कोटी 17 लाख आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना हा प्रकल्प तापी खोर्‍यात स्थित असून या उपसा सिंचन योजनेकरिता धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीतून अस्तित्वातील सुलवाडे बॅरेजच्या वरच्या भागातून पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामूळे धुळे जिल्ह्याच्या अवर्षण प्रवण भागातील शिंदखेडा तालुक्यातील 48 गावातील 26907 हे. व धुळे तालुक्यातील 23 गावातील 6460 हे. असे एकूण 33367 हे.क्षेत्र सिंचीत होणार आहे. या प्रकल्पाची प्रस्तावीत सुप्रमा किंमत 2407 कोटी 67 लाख आहे.