0

मुंबइ,दि.17  : बोरिवलीमध्ये 9 लाख रूपये किंमतीच्या चरससह एकाला अटक करण्यात आली. जोसेफ डिसूजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. बोरिवलीतील कस्तूरबा मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. जोसेफ हा शहरातील विविध ठिकाणी चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबईत आला होता. बोरिवलीतील युवकांना चरस विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर कस्तूरबा मार्ग पोलिसांनी सापळा रचून जोसेफला अटक केली

Post a Comment

 
Top