0
जोहान्सबर्ग, दि. 09, सप्टेंबर - अभिनेत्री प्रिती झिंटा हिने ‘आयपीएल’च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात येणा-या ग्लोबल लीग टी20 स्पर्धेत एक संघ विकत घेतला आहे. यंदा या स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून प्रिती ‘स्टेलेनबॉश’ या संघांची मालकीण असणार आहे. द. आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लोगाट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने द. आफ्रिकेतील टी20 स्पर्धेतील संघ विकत घेतला आहे, यावरून या स्पर्धेची व्याप्ती लक्षात येते. प्रिती झिंटा ही एक नामांकित अभिनेत्री आहे. तिच्या लोकप्रियतेचा या स्पर्धेला नक्कीच फायदा होईल’, असे सांगत लोगाट यांनी प्रितीचे हा स्पर्धेत स्वागत केले.
‘लोगाट यांनी माझे स्वागत केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. लोगाट यांनी क्रिकेटसाठी दिलेले योगदान मोठे व महत्वाचे आहे. या स्पर्धेत त्यांच्यासारख्या चांगल्या लोकांचा सहवास लाभणार असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते’, अशा शब्दात प्रितीने आपल्या भावना व्यक्त केले. 

Post a Comment

 
Top