Breaking News

जिल्हा कृषि औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण पाटील सुसर तर उपाध्यक्षपदी पुष्पलता पाटील

बुलडाणा, दि. 07, सप्टेंबर - जिल्ह्यातील प्रथम नामांकित बुलडाणा जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित बुलडाणा या संस्थेची 4 सप्टेंबर  रोजी सामंजस्य पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अविरोध शिरपूर येथील ज्येष्ठ संचालक नारायण पाटील सुसर यांची अध्यक्षपदी तर तपोवन येथील सौ. पुष्पलता  अविनाश पाटील यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. 
सदर निवडणूकीबाबत माजी मंत्री डॉ.राजेंद्र  शिंगणे, माजी आमदार धृपदराव सावळे यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर व खासदार  प्रतापराव जाधव यांनी सूचना करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तर संस्थेच्या सर्वश्री सदस्यपदी पद्माताई सावळे, पांडुरंगदादा पाटील, प्रभाकर बाहेकर, मधुकर रहाटे,  हिंम्मतराव सानप, मारोती लाहुडकर, अरुण पाटील,  गोपाळराव चव्हाण, सुधाकर मोरे, संतोष राजनकर, संजय म्हस्के, अविनाश पाटील,  प्रताप सावंग, रविकुमार  चुकेवार, विनायक राठोड आदींची निवड करण्यात आली.  संस्थेच्या अध्यक्ष्यपदी विराजमान झालेले नारायण सुसर पाटील यांना दांडगा अनुभव असून ते या  आगोदर खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष, कृउबासचे संचालक राहिले आहेत.  या संस्थेचे ते ज्येष्ठ  संचालक म्हणून गेली अनेक वर्षांपासून काम पाहात आहेत.   त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा संस्थेला फायदा होवून  उत्तरोत्तर प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.