Breaking News

नेत्यांच्या संपत्तीतील होणारी वाढ?

दि. 09, सप्टेंबर - राजकारणातील प्रवाहात आल्यानंतर, मिळणारे आमदार, खासदार, मंत्रीपद यानंतर या राजकीय नेत्यांच्या संपत्तीत होणारी वाढ मोठी आहे.  त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सवाल करत, ही संपत्ती शेकडोच्या पटींत वाढतेच कशी? असा सवाल करत राजकारणांतील भ्रष्टाचारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.  आजची राजकारणांची दिशाच बदलत चालली असून, राजकारणांत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीकडे मोठ मोठे बंगले, आरामदायी लाखोंच्या गाडया, ऐषोआरामांसह सर्व  सुविधा निर्माण केल्या जातात. पूर्वींच्या राजकारणांची दिशा केव्हाच बदलली आहे. पूर्वींचे राजकारणी बसने प्रवास करायचे, सर्वसामान्य माणसांमध्ये वावरायचे, साधी  राहणीमान आणि उच्च विचारसरणी, असा त्यांच्या राजकारणांचा पोत होता, मात्र हा पोत आता बदलला असून, देशांच्या राजकारणांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके  राजकीय नेते आजही साधी राहणी, ठेवत स्वता: च्या तत्वाला जोपासत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांच्या नेमका आर्थिक सोर्स काय याकडे लक्ष  वेधण्याची गरज असून, त्याची चिरफाड होणे गरजेेचे आहे. स्वातंत्र्यानंतर जी संसद भˆष्टाचाराबाबत चर्चा करीत असे ती आज मौन आहे. 21 डिसेंबर, 1963 रोजी  संसदेत चर्चेवेळी समाजवादी डॉ. राम मनोहर लोहिया म्हणाले होते की, भारतात सिंहासन आणि व्यापारामधील संबंध जेवढा दूषित, भˆष्ट आणि बेईमान झाला आहे  तेवढा जगातील कोणत्याही देशात नाही. आधीचे मंत्री, मुख्यमंत्री कौलारूच्या घरात रहात असत. आता एक पंचवर्षीकमध्ये राहून आलीशान बंगला आणि कार उभी  केली न ाही तर जणू अपमान होतो. ज्याला लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते तो मीडियाही मासळी बाजार बनला आहे. पोच असणार्‍यांचे काळे कारनाम्या दडवून  ठेवण्याचा जणू त्याने ठेका घेतला आहे. गुणगान त्याचा पेशा बनला आहे. आणि काही जनताही मतदान कुठे करते. ती तरण नाण्याचा खणखणाट, दारूच्या बाटला  आणि कपड्यांच्या किमतीत मत विकते. स्वातंत्र्यानंतर भारताने ज्या 3 क्षेत्रात विकास केला आहे, त्यात भˆष्टाचार प्रमुख स्थानी आहे. उर्वरित दोन क्षेत्र लोकसंख्या  वाढ आणि कर्जबाजारीपणा आहे. मुळात या तीनही क्षेत्रात मोठी वाढ होणे देशाला पोखरून टाकणारे आहे. अनेक घोटाळेही भˆष्टाचाराची देन आहे. 2011 मध्ये  झालेल्या एका सर्वेमध्ये भˆष्टाचाराबाबत 183 देशांची यादी आली होती, त्या भारत 95 व्या स्थानी होता. भारतासाठी भˆष्टाचार काही नवीन नाही. जानकारांच्या  मते, याची सुरूवात इंग्रजांनी ’फोडा आणि राज्य करा’चे धोरण अवलंबून केली होती. तत्कालीन राजांनी सत्ता संपत्तीच्या लालसेने इंग्रजांशी हातमिळवणी करून  भˆष्टाचाराला चालना दिली, ती वाढतच गेली. परिणामी स्वातंत्र्याच्या एका दशकानंतर भ्रष्टाचाराच्या दलदलीत भारत फसू लागला. आज तर या दलदलीतून बाहेर  पडणे कठीण झाले आहे. सध्याच्या वाढत्या भˆष्टाचाराने लोकशाहीची अस्मिता दुखावली आहे. विलासी जीवनाच्या तीव्र इच्छेने मानवतेची हत्या केली आहे. अर्थ  लोभाने लोक मानवी जीवनाची सार्थकता विसरले आहेत. परिणामी पैशाच्या लालसेने अपात्रांना पात्र आणि पात्रांना अपात्र ठरवून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा  उद्देश्य विफल होत आहे. फक्त छोट्या पदांवरील लोकच नाही तर उच्च पदासीन अधिकारी आणि सत्तेतील शीर्ष लोकही भˆष्टाचार करीत आहेत. लाखो करोडो खर्च  करून मिळवलेल्या पदावर बसलेले लोक अनैतिक मार्ग अवलंबतील तर लहान पदांवरील लोक कुठवर प्रमाणिक राहतील. वरकमाई करणे मग त्यांचेही लक्ष्य बनले  आहे. पदावर राहण्यासाठी रक्कम पोचविण्याची व्यवस्थाही भˆष्टाचाराचे कारण आहे. या सगळ्यात सामान्य माणूस पिचला जात आहे.याला सर्व व्यवस्थाच जबाबदार  असल्याचे म्हणता येईल. शासन-प्रशासनातील तमाम कामचोर स्वातंत्र्याचा अर्थ विसरले आहेत. मंचांवर भˆष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न दाखविणारे लोकच याचे  संरक्षक बनले आहेत. परिणामी रस्ते तयार होतात आणि काही महिन्यातच उखडून जातात. पुल, सरकारी इमारती निर्माणाच्या काही दिवसातच जर्जर होतात.  सरकारी खरेदीमधील सामग्री तर निकृष्ट घेतली जाते आणि पेमेंट उच्च कोटींच्या किमतीत घेतले जाते. कार्यालयात काही मिळाल्याशिवाय बाबू फाइल पुढे सरकवीत  नाही.कारण याला अभय हे राजकारणातील पाठबळातून मिळत जाते.