0
मुंबई, दि. 07, सप्टेंबर - नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसंच बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर  महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.  निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची  मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे.
शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून सुमारे 3 लाख 96 हजार 580 मतदार आहेत. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होणार  आहे. त्यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव  आहेत. 

Post a Comment

 
Top