Breaking News

अर्चना सिन्हा यांच्या बडतर्फीच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून केला विरोध

सोलापूर, दि. 07, सप्टेंबर - भुसावळ रेल्वे विभागातील उपस्थानक व्यवस्थापक अर्चना सिन्हा यांनी कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना तत्काळ बडतर्फ  करण्यात आले. कोणतीही चौकशी करता रेल्वे प्रशासनाने बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने सोलापुरातील सर्व स्थानक  व्यवस्थापकांनी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. भुसावळ रेल्वे विभागात इगतपुरीजवळ रेल्वे रूळाच्या कामासाठी ब्लॉक देण्यात आला होता.  यासाठी रेल्वे थांबवून ठेवण्यात आली होती. मात्र अर्चना सिन्हा यांनी थांबलेल्या गाडीला हिरवा सिग्नल देऊन गाडीला रवाना केले. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर  तत्काळ गाडीला अन्य सहकार्‍यांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला. या प्रकरणात सिन्हा यांना दोषी ठरवून सेवेतून बडतर्फ करण्यात  आले. या आंदोलनात संजीत अर्धापुरे, संजय अर्धापुरे, गुलबर्गाचे एस. एस. मोहन, सोलापूरचे मनोज तिर्की आदींनी काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध नोंदवला.  आमचा विरोधकारवाईला नाही. नियमाप्रमाणे चौकशी समिती नेमणे गरजेचे आहे. त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळणे गरजेचे होते.