0
गुरूग्राम, दि. 10, सप्टेंबर - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी बस वाहक अशोक कुमार याला तीन दिवसांची पोलीस कोठडी  सुनावण्यात आली आहे. आज सकाळी अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि गुरूग्राम येथील न्यायालयात हजर करण्यात आले.  बस वाहकाने लैंगिक शोषण करुन त्यानंतर विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. तसेच, या प्रकरणात सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या  आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नीरज बत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बत्रा यांनी या  घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, शाळेतील व शालेय व्यवस्थापनाच्या अखत्यारितील परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेऊन लवकरात लवकर आवश्यक त्या  उपाययोजना करणार असल्याचेही बत्रा यांनी सांगितले आहे.

Post a Comment

 
Top