0
अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी  गणेशमूर्ती  विसर्जनाचे औचित्य साधत दिवसभरात अकोले शहरानजिक प्रवरानदी काठावर गणेश भक्तांकडून गणेश मुर्ती  व निर्माल्य दान स्विकारत पर्यावरण पुरक गणेश मुर्ती  विसर्जन घडवून आणले. 
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय ताकटे, कार्यक्रम  अधिकारी प्रा. डॉ. सुनिल मोहटे यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयापासून दिंडीचे आयोजन करुन स्वच्छता,  पर्यावरण रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, व्यसन मुक्ती या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक सहभागी झाले  होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. भानुदास खताळ, प्रा. डॉ. महेजबीन सय्यद, प्रा डॉ. विजय काळे, प्रा गणेश भांगरे, कु. शैला बोरसे, प्रा सलीम शेख यांनी परिश्रम  घेतले. स्वयंसेवकांनी दिवसभरात जवळपास 500 गणेश मुर्ती व निर्माल्य जमा केले. अकोलेचे तहसिलदार मनोज कांबळे, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी  स्वयंसेवकांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

 
Top