Breaking News

तलावात बुडालेल्या मुलांच्या पालकांचे खैरेंकडून सांत्वन


औरंगाबाद,दि.8 : पैठण तालुक्यातील फारोळा येथील शिवणाई तलावात गणेश मूर्ती विसर्जन करतांना राजेश गायकवाड, आदित्य किर्तीशाही, सागर तेलभाते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, आज शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी संबंधित तलाठी यांना त्वरित पंचनामा करून शासकीय मदत मिळून देण्याची सूचना केली.