Breaking News

घरातून कामासाठी बाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह नदीत तरंगाताना आढळला


औरंगाबाद,दि.8 : रोजच्यासारखे घरातून कामासाठी मोटरसायकल घेवून बाहेर पडलेला युवक घरी परतला नाही आणि शोधून सपाडला नाही मात्र तिस-या दिवशी पालकांच्या हाती त्याचा मृतदेह लागला. या बाबत हकीकत अशी की आशीष गौतम सोनकांबळे (वय 21) हा युवक औरंगाबाद येथील बुद्ध विहार, रमानगर येथील रहिवासी आहे. तो वाळुज एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होता. सोमवारी (ता.4) रोजी कंपनीत कामाला जातो म्हणून गेलेला आशीष घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोघ केली. तो सापडत नसल्यामुळे अखेर 5 सप्टेंबर रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. नंतर मंगळवारी पोलिसांना कायगांव टोका येथील रामेश्‍वर मंदिर लगतच्या गोदावरी नदीत सकाळी नऊच्या सुमारास पाण्यात एक अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगात पिवळा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पैंट, पाण्याच्यावर एक स्लिपर चप्पल होती. तसेच नदी काठावर हीरो होंडा फैशन प्रो कंपनीची बेवारस मोटर सायकल क्रमांक एम एच 20.सी.ई.7767 ही होती. त्याची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी च्या शवगृहात प्रेत ठेवले होते. बुधवारी पोलिस समन्वयातून तो मृतदेह आशीषचा असल्याचे समजले. सदर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला असून कामाला जाणारा मुलगा नदीकडे का गेला? सोबत कुणी होते का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात पोलिस तपास करित आहेत.