Breaking News

सातार्‍यात सोमंथळी पूल वाहून गेला

सातारा, दि. 15, सप्टेंबर - सातारा जिल्ह्यात महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता टळली आहे. कारण, कालपासून सुरु असणार्‍या पावसामुळे फलटण-बारामती  रस्तावरचा 60 फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. मात्र, वेळीच स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यांनी या पुलावरची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या  दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याच्या प्रयत्न करणारे 2 दुचाकीस्वार वाहून गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे सातार्‍यातील दुष्काळी  पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. तासवडे ते बेलवडे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे 15 घरांवरचं छप्पर उडाले आहेत. तर रस्त्यालगतच्या  हॉटेलचंही नुकसान झालं आहे. तर काही झाडंही उन्मळून पडली आहेत.