0
नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - इरमा वादळाचा तडाखा बसलेल्या अनिवासी भारतीयांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्‍वासन  परराष्ट्र मंत्रालयाने दिले. तसेच अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने आपात्कालीन दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.
अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाचा फटका बसला असून या देशात राहणा-या अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी सरकार  वचनबद्ध आहे. भारतीयांच्या मदतीसाठी अधिका-यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा आणि प्यूर्टो रिकोमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. इरमा वादळामुळे आतापर्यंत17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12  लाख नागरिकांना याचा तडाखा बसल्याचे समजते.

Post a Comment

 
Top