0
नांदेड, दि. 15, सप्टेंबर - नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्त्या करणार्या नराधमास फाशीची शिक्षा  देण्यात यावी म्हणून आज गोलेवार समाजाच्या नागरिकांनी उमरी व हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
सावरखेड येथे गणेश विसर्जन मिरवणूक चालू असताना मिरवणूकीत फिरत असलेल्या ऋषिकेश आपतवाड या बालकास गिरीष गंगाराम कोठेवाड रा. मुदखेड याने  हनुमान मंदिराच्या पाठीमागे नेवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले नंतर त्याला ठार मारले. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Post a Comment

 
Top