0
पुणे, दि. 16, सप्टेंबर - निसर्गाने इतर प्राणी आणि पक्षाप्रमाणे मनुष्यालाही स्वतंत्र अस्तित्व दिले आहे. परंतु आपण ती मान्य करायला तयार नाही. जर एखादा  व्यक्ती यशस्वी झाला तर इतरांनाही त्याने जे केले तेच करायचे असते, आपण स्वतंत्र्य अस्तित्व घडविण्याचा आणि स्वताचे अवकाश शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे  असे मत प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांंनी व्यक्त केले. 
आरभाट लघुपट क्लबच्या चौथ्या र्पर्वाचे उदघाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी,  दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, दिग्दर्शक पायल कपाडीया, हार्दीक मेहता आदी यावेळी उपथित होते.
नागराज मंजुळे म्हणाले, शाळा आणि शिक्षणाच्या चौकटीमध्ये आपण अनेक गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. शाळााबाहृय जग हे शाळेपेक्षा अधिक मोठे आणि अनुरभव  संपन्न आहे, हे अनुभवच माणसाला खछया अर्थाने शहाणपण शिकवितात. इतर काय करतो हे आपल्या मुलांना शिकविण्यापेक्षा त्याचे अस्तित्व स्वत निर्माण करायला  त्याला शिकविले पाहिजे.
उदघाटन समारंरभानंतर कान्स चिपट महोत्सवामध्ये निवडण्यात आलेली पायल कपाडीया दिग्दर्शित आफ्टरनून क्लाऊडस, राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट  अबावंद निवास, अ‍ॅनिमेशनपट फिश करी आणि मेमरीज ऑफ या लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. दिग्दर्शक हार्दीक मेहता आणि पायल कपाडीया यांच्याशी  प्रेक्षकांनी संवाद साधला.

Post a Comment

 
Top