Breaking News

आ. थोरातांच्या प्रयत्नांतून मोधळवाडी व खंडेरायवाडी महसूल गावांची निर्मिती

अहमदनगर, दि. 15, सप्टेंबर - राजस्व अभियानाचे जनक व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपळगांव डेपा या गावातून  खंडेरायवाडी व मोधळवाडी ही दोन महसूल गावे निर्माण झाली आहे. पठार भागातील महत्वाचे असलेल्या पिंपळगांव देपा या गावची लोकसंख्या जास्त आहे. वाड्या व  वस्त्या असल्याने एकत्रित महसूल कामे, ग्रामपंचायतीची कामे करण्यास नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. आ. थोरात यांनी येथील नागरिकांच्या  मागणीनुसार खंडेरायवाडी व मोधळवाडी हे दोन स्वतंत्र महसूल गावे निर्माण करण्याकरिता पाठपुरावा केला. 
वाड्यावस्तीवरील नागरिकांना विविध दाखले, कागदपत्रे काढण्यासाठी सातत्याने ये-जा करावी लागत होती. म्हणून पंचायत समितीचे किरण मिंडे व स्थानिक  गावकर्यांच्या पाठपुराव्यातून आता नव्याने खंडेरायवाडी व मोधळवाडी या मौजे गावांची निर्मीती झाली आहे. पिंपळगांव देपा मध्ये ग्रामपंचायत, विद्यालय, तलाठी  कार्यालय, सेवा सोसायटी यासंह विविध सहकारी संस्था आहेत. नाशिक-पुणे महामार्गासाठी आ. थोरात यांनी मल्हारघाट या नवीन रस्त्यांची निर्मिती केल्याने  परिसरात दळणवळणही वाढले आहे.
या पाठपुराव्याबद्दल गावकर्यांनी आ. थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अजय फटांगरे, शंकर खेमनर, सत्यजित तांबे, किरण मिंडे प्रांताधिकारी भागवत  डाईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, भूमीअभिलेखचे वाघ यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.