0

अहमदनगर,दि.9 : औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाटात गुरुवारी सायंकाळी झालेल्या झेन कार व आयशर टेम्पोच्या अपघातात कारमधील पिंपरीचिंचवडचे दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती समजताच एम आय डी सी पोलीस  ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले.त्यांनी अपघातग्रस्तांची ओळख पेटवण्याचे काम करून मयत व जखमींना सिव्हिल मध्ये पाठवले व रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवली. नागरवरून औरंगाबाद कडे नंबर नसलेला आयशर टेम्पोची चेसी चालक घेऊन जात असताना औरंगाबादकडून नगर कडे झेन कार (एम एच 14 ए एफ 9484) येत असताना इमामपूर घाटातील एका वळणावर ओव्हरटेक करत असताना समोरासमोर दोघांची धडक झाली.या अपघातात कारमधील सचिन कुटे, (चाकण), ऋषिकेश नलावडे ( विश्रांतवाडी ) हे जागीच ठार झाले तर अमित माने हे जखमी झाले.

Post a Comment

 
Top