Breaking News

महाराष्ट्र वार्षिकीत चौफेर व अद्ययावत माहितीचा साठा

औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, शासनाच्या विविध योजना, महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, विधी मंडळ  सदस्य, संसद सदस्य इतक्या विविध स्वरुपातील महत्वाच्या माहितीचा साठा एकाच ग्रंथात उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ वाचनिय  उपयुक्त अणि अधिकृत संदर्भ ग्रंथ बनला असून प्रत्यकाने तो संग्रही ठेवावा असे आवाहन मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.  माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र वार्षिकी 2017 हा ग्रंथ संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांनी आज लोकशाही  दिनाच्या प्रारंभी आयुक्तांना भेट दिला. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दंड,महसूल  उपायुक्त प्रल्हाद कचरे, (सा.प्र) उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, महानगर पालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांच्यासह विविध विभागाच्या प्रमुखांची उपस्थिती  होती. या पुस्तकाची किंमत 300/- (तीनशे रूपये) असून जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद, अरिहंत बिल्डींग, खडकेश्वर, मिलकॉर्नर रोड, औरंगाबाद येथे हे  पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे.