Breaking News

पीएमपी बससेवा, दरवाढ या विषयावर शनिवारी प्रवासी मेळावा

पुणे, दि. 15, सप्टेंबर - पीएमपीकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी,  अशी मागणी पीएमपी प्रवासी मंच तर्फे करण्यात आली आहे. यावर चर्चा करण्यासाठी पीएमपी प्रवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पीएमपी बस  सेवा, पास दरवाढ आणि मोटार वाहन कायदा या विषयांवर देखील चर्चा होणार आहे. शनिवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजता म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य  सभागृह येथे हा मेळावा होणार आहे.
यावेळी आरटीएचे सचिव आरटीओ बाबासाहेब आजरी हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश  चितळे, यतीश देवडिगा हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणा-यांचा मोफत पास देऊन सन्मान करण्यात येणार आहे.जुगल  राठी म्हणाले की, बस पास हे पीएमपीकरिता आगाऊे उत्पन्न असते. बसपास द्वारे प्रवास करणा-यांची संख्यादेखील मोठी आहे. पीएमपीच्या पासने प्रवास करणारा  प्रवासी हक्काचा असूनही यामध्ये करण्यात आलेली वाढ जाचक आहे. यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसाय होणार आहे. याबाबत प्रवाशांनी आपल्या  सूचना आणि तक्रारी मेळाव्यात मांडून पीएमपी सक्षम करण्याकरिता पुढे यायला हवे. पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित मोफत पास योजना व उपक्रमात सहभागी  होण्याकरीता 9850958189, 9422017156 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.