Breaking News

निळवंडेतून राजूरसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच निधी: आ.पिचड

अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - संगमनेर व अकोले बत्तीस गाव  पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर निळंवनडे धरण जलाशयातून राजूर गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणार आहोत. त्यासाठी लागणार निधी देखील लवकरच उपलब्ध होईल, असे आ. वैभवराव पिचड यांनी सांगितले.  
राजूर पाणी पुरवठा योजनेचे थकलेले वीजबिल भरण्यासाठी ज्या राजूरकरांनी आर्थिक स्वरूपाची मदत केली. त्यांच्या सत्काराचे व रक्कम परत करण्याचा जाहीर कार्यक्रम राजूर येथे  विठ्ठल मंदिरात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन आ. पिचड बोलत होते. राजूर पाणी पुरवठा योजनेचे सुमारे दीड कोटी रुपये थकले होते. आ. पिचड यांनी शासन पातळीवर प्रयत्न करून त्यातील सत्तर लाख रुपये माफ झाले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतीला पैसे कमी पडत होते. तेव्हा सरपंच सौ. पिचड यांनी राजूरकरांना मदतीचे आवाहन केले.
त्यानंतर सुमारे पंचवीस लाख रुपयांची मदत उभी राहिली त्या मदत करणार्‍या ची सर्व रक्कम आज राजूर ग्रामपंचायतीने सत्कार करून आ. पिचड यांचे हस्ते परत केली. या वेळी व्यासपीठावर सरपंच सौ. हेमलताताई पिचड, उपसरपंच गोकुळ कानकाटे, आदिवासी उन्नतीचे खजिनदार माधव गभाले, ग्रामसेवक भाऊसाहेब रणशिंग बाजार समितीचे संचालक विजय लहामगे, व्यापारी  अरुण माळवे, देवराम लहामगे, रमेश मुर्तडक, सचिन मेहता, उपस्थित होते. आ. पिचड म्हणाले कि, वीजबिल भरण्यासाठी राजूरकरांनी आठ दिवसात रक्कम गोळा केली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. वीजबिलाची रक्कम जेवढी माफ झाली त्यावर अजून वीजमंडळाचे मुख्य अभियंता यांची सही होणे बाकी आहे. ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती साठी 40 लाख रुपये प्राप्त झाले त्यातून व्यापार्‍यांनी जी मदत केली ती आज परत करीत आहोत. त्यातही काही नतद्रष्ट लोकांनी अडथळे आणले परंतु त्यावरही मात करावी लागली. राजूर मध्ये अनेक विकास कामे मंजूर आहेत परंतु यांच्या मुळेच ती सुरु करता येत नाही. राजूर गावासाठी नीळवनडे धरणातून थेट पाईप लाईन ने पाणी पुरवठा करण्याची सौ. पिचड यांची संकल्पना आहे तिमुर्त स्वरूपात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी आदिवासी उपयोजने बरोबरच चवदावा वित्तआयोग, पेसा, यांचाही निधी वापरून 60लाख रुपयांची हि योजना लवकर पूर्ण करू. राजूर गावातील दत्त मंदिरासाठी 10लाख, विश्‍वकर्मा मंदिरासाठी 5 लाख, विठ्ठल मंदिरासाठी 10 लाख, मरीआई मंदिरासाठी  7 लाख, अल्पसंख्यांक निधीतून प्रत्यकी गावासाठी 10 लाख रुपये मंजू र केले यामध्ये राजूर, कोतुळ,ब्राम्हणवाडा गावांचा समावेश आहे. असेही आ. पिचड म्हणाले.                                      सरपंच सौ. हेमलता पिचड म्हणाल्या की, 70 वर्षांच्या इतिहासात राजूरकरांनी मला 2011 साली बिनविरोध निवडून दिले. तेव्हा चे राजूर आणि  आत्ताचे राजूर फार बदलले आहे. एक कोटीचे नुसते वीज बिल होते.
पाण्याचा प्रश्‍न जटिल होता तो आपण मार्गी लावला. राजूरच्या सर्वच भागात आज तुम्हाला रस्ते काँक्रिटचे दिसतील. कचरा साफ झाला. आता मला निळवंन्दे धरणातून राजूरला पाणी पुरवठा योजना करावयाची आहे . त्यासाठी आवशयक निधीही उपलब्ध होणार आहे. राजूर गावच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पण काही लोक अडथळे आणीत आहेत. ग्रामसभा, मिटींगा होऊ देत नाही. त्यामुळे विकास कामात अडथळे निर्माण होत असल्याची खंत  सौ. पिचड यांनी व्यक्त केली.
यावेळी अविनाश बनसोडे, गौतम पवार, विजय लहामगे, यांचीही भाषणे झाली. यावेळी शेखर वालझाडे, सौ. पुष्पा निगळे, राम पन्हाळे, गिरीश बोर्‍हाडे, दौलत देशमुख, सुनील शहा, भास्कर पाबळकर, शशिकांत देशमुख, गौरव माळवे, हेमंत येलमामे, संतोष चांडोले, महेश माळवे, गुलाब खाटीक, पांडुरंग कवडे, बिपीनचंद्र ओहरा, शरद शिंदे, संदीप वाळे, दिनेश मेहता, हर्षल सोनार, हर्षल ओहरा, निलेश मुर्तडक, नितीन चोथवे, राजेश केळकर, रामेश्‍वर हंगेकर, किरण कानकाटे, संतोष कानकाटे, किरण वर्‍हाडे, किरण तारगे, सोमनाथ पाबळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन संतोष बनसोडे यांनी केले.