Breaking News

रॉकेलच्या परवाना धारकाला पाठीशी घालणार्‍या नायब तहसीलदाराचे निलंबन


परभणी,दि.17 : रॉकेलच्या किरकोळ परवानाधारकाला पाठीशी घालणे जिंतूरच्या नायब तहसीलदाराला चांगलेच भोवले असून जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. जिंतूर तालुक्यातील येनोली येथील किरकोळ परवानाधारका बाबत ग्राहकांच्या तक्रारी होत्या तपासणीत त्यात तथ्यही निदर्शनास आले होते .या मुळे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन तहसीलदार अश्‍विनी जाधव यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार एस.ए. घोडके यांना सांगितले होते मात्र, घोडके यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्या बाबत काहीही न करता त्यांनी कार्यालयात येणेहि टाळले .गेले वीस दिवस ते कार्यालयात हजर झाले नाहीत त्या बाबत काहीही परवानगी घेतली नाही.तहसीलदारांच्या कारणे दाखवा नोटीसीलाहि केराची टोपली दाखवली. या सर्व कारणामुळे तहसीलदारांच्या अहवालावरून आज 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी घोडके यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत आज जिंतूर तहसील कार्यालयात याचीच चर्चा होती.