Breaking News

दुलीप करंडक : अभिनव मुकुंद सलामीच्या सामन्याला मुकणार

लखनौ, दि. 07, सप्टेंबर - इंडिया रेड संघाचा कर्णधार अभिनव मुकुंद प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुलीप करंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्याला मुकणार आहे.  लखनौच्या एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिलाच क्रिकेट सामना असणार आहे. मुकुंदच्या अनुपस्थितीत 7 तारखेला होणा-या इंडिया ग्रीन  संघाविरूद्धच्या सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक संघाचे नेतृत्व करणार आहे. मुकुंद संघाबाहेर असल्यामुळे सुदीप चॅटर्जीला प्रियांक पांचाळबरोबर  सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मुकुंदच्या जागी अंबाती रायुडू किंवा बाबा अपराजीत याला अंतिम संघात स्थान मिळू शकते.