Breaking News

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश्‍वर यांच्यावरील हल्याचा नाशकात पत्रकरांकडून निषेध

नाशिक, दि. 07, सप्टेंबर - देशपातळीवर तसेच महाराष्ट्र राज्यात समाजकंटक,माफिया,गुंड राजकारण्यांकडून पत्रकारांवरील वाढते हल्ले,निर्घृण हत्या वाढल्या आहेत.पत्रकार हल्ला विरोधी समित्या ही निष्क्रिय झाल्या असून पत्रकार संरक्षण कायदा अजूनही पुरता पारित झाला नाही,परिणामी पत्रकारांवरील जीवघेने हल्ले थांबले नाहीत,नुकतीच बँगलोर येथील जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश्‍वर यांची समाजकंठकांनी निर्घृण हत्या केली,या घटनेचा नाशिक शहरातील पत्रकारानी तीव्र निषेध व्यक्त केला.
पत्रकारांवर हल्ले करणारे गुन्हेगार, हल्लेखोर समाजात उजळमाथ्याने फिरतात,अशी स्थिती आहे, गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत पत्रकार असुरक्षित असतांना हे सत्र थांबणार कधी?अश्या आशयाचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन अखिल भारतीय पत्रकार समन्वय समितीच्या वतीने नाशिकचे निवासीे उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.
तसेच जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समितीची मुदत 6 महिन्यापूर्वीच संपली आहे.या समितीचे गठन करतांना जिल्ह्यातील प्रमुख पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी घेऊन नव्याने जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समिती स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन करण्यात आले.याबाबत जिल्हा माहिती अधिकारी यांना याबाबाबत सूचना करू असे निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी सांगितले.
यावेळी समिती अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती वतीने पत्रकारांनी शासकीय वृत्ताकनावर बहिष्कार टाकावा,शासनाचे पुरस्कार नाकारावे असे आवाहन केले.जो पर्यंत पत्रकार संरक्षणाचा कायदा पारित होत नाही तो पर्यंत पत्रकारांनी गटतट विसरून एकत्रित लढा द्यावा असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले.
पत्रकरांवरील हल्ले थांबावे यासाठी शासनाने तातडीने कायदा पूर्णत्वास न्यावा यासाठी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना पत्रकार संरक्षणाबाबत आदेशीत करावे याबाबत निवेदन देन्यात आले,निवेदन देतेवेळी अखिल भारतीय पत्रकार समन्वय समितीचे अध्यक्ष सतीश रुपवते,जर्नालिस्ट ऍक्टिविझम फोरमचे अध्यक्ष राम खुर्दळ,पत्रकार समन्वय समितीचे सचिव दिलीप सोनार, भुपेंद्र बारू,सुरेश भोर,अमर ठोंबरे,राजेंद्र गवारे,सचिन तुपे,दादाजी पगारे,मायाताई खोडवे हे उपस्थित होते.