0
पुणे, दि. 16, सप्टेंबर - कार्यक्षम अधिकारी असे नाव लौकिक असलेले अधिकारी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात  आली आहे. तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या  शुल्कामध्ये वाढ केल्याच्या कारणावरून ही धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापक अजय राजाराम चारखानकर यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. भुजंगराव मोहिते-पाटील (रा. सुखसागरनगर, कात्रज) असे धमकी देणार्‍या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही व्यक्ती खरी आहे की खोटी  याचा शोध घेतला जात आहे.
मोहिते नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहलेल्या या धमकीच्या पत्रात म्हटले आहे की, पीएमपीमध्ये तुम्ही केलेली तिकीट भाडेवाढ समर्थनीय नाही. तुम्ही केलेल्या  भाडेवाडीमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Post a Comment

 
Top