Breaking News

नागपुरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड ; दोन तरुणींची केली सुटका

नागपूर, दि. 14, सप्टेंबर - नागपुरातील चिंचभवन परिसरातल्या ’स्टार लाईट फॅमिली सलून अँण्ड स्पा येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर गुन्हे  शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने 13 सप्टेंबर रोजी धाड घातली. येथे सलुन आणि स्पा च्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय सुरू होता. ’सलून अँण्ड स्पाची  संचालिका संगीता गोपीचंद गजभिये (35, रा. वाडी) हिला दलाल म्हणून अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता गजभिये विवाहित असून ती गेल्या दीड वर्षांपासून सेक्स रॅकेट चालविते. त्यासाठी तिने चिंचभवनमध्ये शांती अपार्टमेंट येथे  भाड्याने दोन गाळे घेतले होते. तिथे ’स्टार लाईट फॅमिली सलून अँण्ड स्पा सुरू केले होते. तिथे दोन युवतींना पुरुषांची मसाज करण्यासाठी ठेवण्यात आले होते.  संगीता ही पूर्वी अशाच प्रकारच्या एका ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होती. तिने सलूनमध्ये काम करणार्या दोन्ही युवतींना सेक्स रॅकेटमध्ये जास्त पैसा असल्याचे  आमिष दाखवले. त्यामुळे दोन्ही युवती देहविक्री करण्यासाठी तयार झाल्या. या स्पामध्ये मोठमोठया पांढरपेशा लोकांची वर्दळ वाढली होती. त्यानंतर अनेक  कार्यकर्तेही गर्दी करीत असल्यामुळे नागरिकांना संशय आला. नागरिकांनी पाळत ठेवून सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा  रचून एका बनावट ग्राहकाला सलूनमध्ये पाठवले. त्याने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून दोन्ही मुलींना ताब्यात घेतले आणि संगीताला अटक केली. ही कारवाई  पोलिस निरीक्षक शुभदा संखे, सहा. पोलिस निरीक्षक अमिता जयपूरकर यांच्या चमूने केली.