Breaking News

किसनवीर परिवाराची कामगिरी मोलाची : मकरंद अनासपुरे

सातारा, दि. 16, सप्टेंबर - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत करणे, एवढाच नाम फौंडेशनचा हेतू नाही तर त्यांच्यासाठी एकूण 26 उपक्रम  राबविले जातात. आमच्या या कामाला इतरांचे हात लागून अशा कामात कोट्यवधी हात निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा आहे. किसन वीर कारखान्यावर आल्यानंतर  याच कामाला अतिशय मोलाचा हातभार लावणारे हात येथे दिसून आले. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, मदनदादा भोसले यांचे याबाबतचे काम पाहून भारावलो असून  याबाबत त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहवत नाही, असे प्रतिपादन नाम फौंडेशनचे संस्थापक तथा प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. 
किसन वीर कारखान्याला सदिच्छा भेट आणि वाई येथील किसन वीर महाविद्यालय येथे आत्महत्याग्रस्त शेतक्यांच्या मुलांसाठी मोफत निवासी शिक्षण उपक्रमाची  माहिती घेण्यासाठी अनासपुरे किसनवीरनगर येथे आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले,  उपाध्यक्ष गजानन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाम फौंडेशनने ज्या हेतूने काम चालविले आहे त्या हेतूशी नाते सांगणारे काम वाईत ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी वाईच्या किसन वीर महाविद्यालयात सुरु केले  आहे. या कामासाठी नाम फौंडेशनकडून त्यांनी एक रुपयाचीही अपेक्षा व्यक्त न करता या वसतीगृहात आत्महत्याग्रस्त शेतक्यांच्या मुलांना नाम फौेंशनतर्फे पाठविण्याची  विनंती प्रतापरावभाऊ भोसले यांनी केली. त्यांच्या या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतक्यांच्या कुटुंबियांना खूप मोठा दिलासा मिळणार असून या कामाचे मोल  संवेदनशील मनच जाणू शकते. त्याचसोबत किसन वीर कारखान्याने जलसंधारण, पर्यावरण क्षेत्रात केलेले काम थक्क करणारे आहे. हे काम अधिक सविस्तरपणे  पाहण्यासाठी नाना पाटेकर यांच्यासमवेत पुन्हा लवकरच या ठिकाणी येणार आहे. एखाद्या राजकीय व्यक्तिला भेटल्यानंतर केवळ आणि केवळ सामाजिक कामच  पहायला मिळते हि अनोखी बाब असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा.
नाम फौंडेशनला दि. 15 सप्टेंबर रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने फौंडेशनच्या कामाची माहिती देणा्या चित्रफितीचे पहिले सादरीकरण कारखान्याच्या  यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. फौंडेशनचे काम पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
मकरदं अनासपुरे यांचा सत्कार मदनदादा भोसले यांनी केला. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालकन केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार  मानले. यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश  पवार-पाटील, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, आशा फाळके, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, मोहनराव भोसले, डॉ. सुरूभि भोसले, इशान  भोसले, विराज शिंदे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. येवले, सचिव अनिल जोशी, सहसचिव नारायण चौधरी,  सतिश भोसले, अजय धायगुडे, शेखर भोसले-पाटील, दे, सुरेश पवार, हरिभाऊ धुमाळ, दत्तात्रय ढेकाणे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.