Breaking News

अजित पवारांची विनोद तावडेंवर टीका


औरंगाबाद,दि.17  : क्रीडा शिक्षक नाहीत तर दहा लाख जणांकडून फुटबॉल खेळण्याची अपेक्षा कशी ठेवता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.औरंगाबादमध्ये डॉ. उल्हास उडान लिखित यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा आशय’या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारोशी बोलत होते. या पुस्तक प्रकाशनावेळीही फ. मु. शिंदे व इतर साहित्यिक मंडळींनीहि औरंगाबादच्या रस्त्यावरील खडयावर विनोदी कविता केल्या. या मुळे सदर व्यासपीठ साहित्यिक आहे की राजकीय असा प्रश्‍न उपस्थितांना पडला. सदर कार्यक्रम देवगिरी महाविदयालयात झाला.त्यांनतर पत्रकारांशी बोलताना पवार यांचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर जास्त रोख होता. पुढे जायचे असेल तर अभ्यास करावाच लागेल. सध्याची परिस्थिती भयंकर आहे. अभ्यास करून चांगला पेपर लिहला तरी त्याचा निकाल कधी लागेल, हे सांगणे अवघड आहे मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे हे कळाले अशी खिल्ली त्यांनी उडविली.महाविद्यालयांत क्रीडा शिक्षक नाहीत, मुलांना कसलेही प्रशिक्षण दिले नसताना दहा लाख जणांकडून फुटबॉल खेळण्याची अपेक्षा कशी ठेवता असा सवाल त्यांनी केला. या सरकारच्या नियोजनाचा बोजवारा असून कोळसा आणण्याकडे दुर्लक्ष केल्याने विजेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो अशी टीका त्यांनी केली.या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. फ. मुं. शिंदे, आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.