Breaking News

ट्रक आणि इंडिका कारच्या धडकेत तिघे ठार

बीड, दि. 07, सप्टेंबर - औरंगाबाद ते बीड दरम्यानच्या रस्त्यावर ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होऊन काल मध्य रात्री रांजणी गावाजवळ झालेल्या अपघातात इंडिका कारचा चुराडा होऊन कारमधील तिघे ठार झाले. तिघेही गेवराई तालुक्यातील आहेत.
रात्री दोन वाजता हिरापुर येथून गेवराईकडे इंडिका कार क्र- एम.एच.43 डी.1188 ही जात होती तर ट्रक क्र-एम.एच.20 ए.टी.9797 हा औरंगाबदकडून बीडकडे जात होता.या दोनही वाहनांची समोरासमोर धडक झाली यात कारच्या अर्ध्या भागाचा चुराडा झाला .कारमधील अविनाश गव्हाणे (वय 36), बजरंग ढोने (वय 35) दादाराव मुजांळ (वय 34) दोघे राहणार हिरापूर हे तिघेही ठार झाले.