0

मुंबई,दि.8 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे छायाचित्र काढणा-या छायाचित्रकारांना तिच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली. 
सोनू आणि हिमांशु शिंदे अशी या दोघांची नावे असून हे दोघेही यात गंभीर झाले आहेत. छायाचित्रकारांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली. शिल्पा आणि तिचा पती खारच्या बॅस्टियन हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी या दोन्ही छायाचित्रकारांनी शिल्पाचे छायाचित्र काढले. सुरक्षा रक्षकांनी या छायाचित्रकारांना विरोध केला. मात्र त्यांनी आपले छायाचित्र काढण्याचे काम सुरु ठेवल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एका छायाचित्रकाराचे कपडे देखील फाटले असून त्यांच्या चेह-यातून रक्त येत होते.

Post a Comment

 
Top