0
अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - शहरात दोन गटात  रिक्षा लावण्याच्या कारणावरुन तुपान हाणामारी होवून त्यात एक तरूण गंभीर जखमी झाला. 
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार पाथर्डी येथील कोरडगाव चौकात घडला. रिक्षा लावण्यावरून दोन गटात जोरदार मारामारी झाली. त्यात  सचिन चंदू  पवार हा गंभीर जखमी झाला असून त्यास अहमदनगर येथील खासगी रुग्कणायात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पाथर्डी  पोलिस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.  प्राथमिक माहिती अशी की, आज बुधवारचा दिवस असल्याने बाजारात गर्दी होती.  कोरडगाव चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी खासगी जीप, रिक्षा, लावण्यावरुन अनेकदा वाद होत असतात. आजचा प्रकारही त्यातूनच घडला. रिक्षा  लावण्यावरून दोन रिक्षाचालकात वादाला सुरवात झाली.
 त्यावेळी एकाचा मित्र मध्यस्थी करण्यासाठी गेला असता समोरील चार ते पाच युवकांनी त्याला मारयाला सुरवात केली. बाजार दिवस असल्याने वाद पाहण्यास  मोठी गर्दी गोळा झाली. तशी मारामारीही वाढली. दोन गटात वाद सुरु झाल्याने लोक सैरावैरा पळू लागले. काही लोक वाहनातून उतरुन पळून गेले. मात्र इतके  होवूनही घटनास्थळाकडे पोलिस फिरकताना दिसते नाही.शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून वादाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

Post a Comment

 
Top