Breaking News

प्राथमिक शाळांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा होणार

लखनौ, दि. 09, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त17 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळा रविवार सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात 1.60 लाख प्राथमिक शाळा असून या सर्व शाळांमध्ये पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनुपमा जैस्वाल यांनी दिली.
मतदारसंघातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये त्या-त्या आमदारांनी उपस्थित राहून मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगावे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केल्यास पंतप्रधानांचे ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.