Breaking News

घुसखोर रोहिंग्या मुस्लिमांमुळे देशाला धोका, गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना व केंद्र शासित प्रदेशांना अवैधरितीने घुसखोरी करणा-यारोहिंग्या मुस्लिमां संदर्भात मार्गदर्शक  तत्वे जारी केली आहेत. त्या नुसार घुसखोरी केलेल्यांची हकालपट्टी करण्यात येणार असून रोहिंग्या मुस्लिमांमुळे देशाला धोका असल्याचे त्यात म्हटले आहे.
सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना रोहिंग्या मुस्लिमांचा भारताविरोधातल्या कारवाईसाठी वापर करत आहेत. सध्या भारतात अवैधरित्या  घुसखोरी केलेले 40 हजार रोहिंग्या मुस्लिम असल्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, हैदराबाद, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली व राजस्थानमध्ये रोहिंग्या मुस्लिमांची  संख्या अधिक आहे. यातील एकट्या जम्मूमध्ये तब्बल 10 हजार रोहिंग्या मुस्लिम राहत असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना या  मुस्लिमांचा आपल्या कारवायांसाठी वापर करत असल्याची माहिती मिळाल्याने सरकारकडून ही पावले उचलली जात आहे.