0
बीजिंग, दि. 10, सप्टेंबर - चीन व पाकिस्तानमध्ये देशांत रेल्वे व रस्ते प्रकल्पांसाठी 50 अब्ज डॉलरच्या आर्थिक कॉरिडॉरसह दहशतवादविरोधी व सुरक्षा सहकार्य  अधिक मजबूत करण्याबाबतच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवण्यात आली आहे.
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर उत्तर-पश्‍चिम चीनमधील शिनजिआंग प्रांताला दक्षिण-पश्‍चिम पाकिस्तानला अरबी समुद्रात ग्वादर बंदराशी जोडला जाणार आहे. या  दोन्ही प्रदेशात दहशतवाद्यांचा धोका आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या बेल्ट ऍण्ड रोड प्रकल्पाचा भाग असलेला हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधून जातो.  यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
उपरोक्त कॉरिडॉरशी संलग्न योजनांवर काम करणा-या चीनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 15 हजार सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे राजकीय व कायदा आयोगाचे प्रमुख मेंग जियांझू यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ व पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा  सल्लागार नासीर खान जांजुआ यांची भेट घेतली. या भेटीत सुरक्षा सहकार्याबाबत करार करण्यात आला. चांगले मित्र, मैत्रीपूर्ण शेजारी व सर्वांगीण धोरणात्मक  सहकार्यात भागीदार म्हणून चीन व पाकिस्तान एकमेकांच्या हितासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे मेंग जियांझू यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top