Breaking News

साईबाबा पुण्यतिथी उत्सव; दोन दिवस समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले रहाणार

मुंबई, दि. 15, सप्टेंबर - श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने श्री क्षेत्र शिर्डी येथे 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात 99 वा पुण्यतिथी  उत्सव साजरा करण्यात येणार आहे. साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता दि.29 सप्टेंबर व दि.30 सप्टेंबर 2017 रोजी (दोन दिवस) समाधी मंदिर  दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिर्डी केले.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, यापुर्सवाच्या मुख्य दिवशीच समाधी मंदिर उघडे ठेवण्यात येत होते. परंतु साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून उत्सवाच्या प्रथम  व मुख्य दिवशी असे दोन दिवस समाधी मंदिासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दि.29 संप्टेबर रोजी नित्याची शेजारती व दिनांक 30 सप्टेंबर रोजी पहाटेची  काकड आरती, रात्रौ 10.30 वाजता होणारी शेजारती आणि दि.01 ऑक्टोंबर रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5.00 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे 5.15 वाजता  व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी  4.00 ते 6.00 यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ 7.30 ते 10.30  यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्टेजवर होईल. रात्रौ 9.15 वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस  असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर व समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील.
शनिवार, दिनांक 30 सप्टेंबर हा उत्सवाचा मुख्य दिवस . या दिवशी पहाटे 5.00 वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे  5.15 वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी 9.00 वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी 10.00 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता  आराधना विधी व दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी 5.00 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी  6.15 वाजता धुपारती होईल. रात्रौ 7.30 ते 10.00 यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्टेजवर होणार आहे. रात्रौ 9.15 वाजता श्रींच्या  रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्रौ 11.00 ते पहाटे 5.00  यावेळेत श्रींचे समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.
रविवार, दिनांक 01 ऑक्टोंबर उत्सवाच्या तृतिय दिवशी सकाळी 5.05 वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी 6.30 वाजता समाधी शताब्दी शुभारंभ  निमित्त शोभा यात्रा काढण्यात येऊन सकाळी 10.00 वाजता ध्वजारोहण व समाधी शताब्दी उदघाटन कार्यक्रम, दुपारी 12.10 वाजता माध्यान्ह आरती तीर्थप्रसाद,  सायं. 4.00 वाजता कीर्तन कार्यक्रम व सायंकाळी 6.15 वाजता धुपारती होईल. रात्रौ 7.30 ते 10.00 यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील  स्टेजवर होणार रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.