0

पुणे,दि.8 : चिंचवड गावात टोळक्याने धुडगूस घालत परिसरातील 10 ते 15 वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगलमूर्तीवाडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.या घटनेमध्ये रिक्षा, कार, टेम्पो अशा वालाकडी दांडके, दगड याच्या साहाय्याने तोडफोड केली. दरम्यान, प्राथमिक माहितीवरून दोन टोळक्यातील भांडणातून ही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

 
Top