Breaking News

एक्सप्रेस वे’वर मोटार अपघातात परभणीचे आ. मधुसूदन केंद्रे जखमी

पुणे, दि. 15, सप्टेंबर - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सिंहगड कॉलेजसमोर बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मोटार अपघातात गंगाखेड परभणी  येथील राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन माणिकराव केंद्रे यांचे दोन्ही हात फॅक्चर झाले असून त्यांचा चालक माधव गणेश पवार हे किरकोळ जखमी झाले  आहेत.अपघाताबाबत चालक पवार यांनी लोणवळा ग्राीस ठाण्यात फिर्याद दिली. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास केंद्रे हे त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीतून पुण्याच्या दिशेने  जात असताना एका भाजीपाला घेऊन जाणार्या पांढर्या रंगाच्या अज्ञात टेम्पोने त्यांच्या गाडीला कट मारला. यामध्ये फॉर्च्यूनर चालक पवार यांना गाडी कंट्रोल न  झाल्याने ती समोर जाणार्या ट्रकला धडकून सदरचा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.