Breaking News

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांकडून एक संशयित ताब्यात

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयिताची चौकशी सुरू  असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी या संशयिताला ताब्यात  घेतल्याचे समजते. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या क्षमतेबाबत शंका असल्याने लंकेश यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत तापस व्हावा अशी  मागणी केली आहे. लंकेश यांचे निवासस्थान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे.
मुंबई प्रेस क्लब, बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट यांच्यासह अन्य काही माध्यम क्षेत्रातील संघटनांनी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला असून लंकेश यांच्या  मारेक-याला लवकर पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे.