0
नेप्यीता, दि. 07, सप्टेंबर - दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता मुक्त नव भारताची निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे  सांगितले. म्यानमारमधील भारतीय नागरिकांना ते संबोधित करत होते.
भारत व म्यानमार यांच्यातील भावनात्मक नाते उगडून सांगताना पंतप्रधान म्हणाले की मला लहानपणापासून धार्मिक व आध्यात्मिक शहरात जाण्याची इच्छा होती.  यांगून शहरात येऊन माझे ते स्वप्न पूर्ण झाले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात म्यानमारची भूमिका, आझाद हिंद सेनेचा इतिहास व विपश्यना यांचा परस्परांशी संबंध  आहे.
ॠनव भारत’ संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतीयांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
अनेक भारतीय परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करत असून भारताचे नाव उंचावत आहेत. प्रवासी भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा व अन्य आवश्यक  कार्यवाहीसाठी भारतीय दूतावास 24 तास चालू रहाणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान ॠमोदी, मोदी’च्या  घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

Post a Comment

 
Top