Breaking News

किरकोळ कारणामुळे झालेल्या भांडणात रिक्षाचालकाने केला पादचा-याचा खून

उस्मानाबाद,दि.8 : रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाने पादचा-याचा खून केला. रामकुंड येथून सरमकुंडी फाट्याकडे बुधवारी रात्री क्रमांक एम.एच. 23 एच 7904 या रिक्षाने याच रस्त्याने जात असलेल्या संतोष विनायक डोंबाळे (वय 27 रा. वंजारवाडी, ता. भूम) यांना कट मारला यामुळे रिक्षाचालक अशोक रामभाऊ लोखंडे (रा. सरमकुंडी, ता. वाशी) व संतोष मध्ये बाचाबाची झाली आणि रिक्षाचालक अशोक रामभाऊ लोखंडे याने संतोषच्या डोक्यात लोखंडी गज मारला या मुळे संतोष मरण पावला. पोलिसांनी रिक्षाचालक अशोक लोखंडे यास अटक केली असून त्याची साथीदार नकुला रंगनाथ चंदनशिवे (रा. रामकुंड ता. भूम) ही फरार आहे पोलिस तपास करित आहेत.