Breaking News

सुनावणीसाठी कुख्यात दहशतवादयांची औरंगाबाद न्यायालयात हजेरी

औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - 2012 साली औरंगाबादेतील हिमायतबाग येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील आरोपी दहशतवादयांना आज वेगवेगळ्या शहरांच्या  कारागृहांतून औरंगाबादला न्यायालयात हजर करण्यात आले होते. खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयात सुरू असून काहीं आरोपींचे बंद दरवाजात जबाब  नोंदविण्यात आले. 
हिमायतबागेत झालेल्या चकमकीत एटीएस पथकातील पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात दहशतवादी अबरार याला अहमदाबाद कारागृहातून तर इतर काही  दहशतवाद्यांना नाशिक आणि औरंगाबाद येथील कारागृहांतून कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. या अतिरेक्यांना प्रवास करून  औरंगाबादला आणण्याची जोखीम नको म्हणून व्हिडीओकॉन्फरन्स व्दारे सुनावणी करण्यात येणार होती परंतू आवज संदीग्ध येत असल्याने त्यांना सुनावणीसाठी  प्रत्यक्ष न्यायालयात आणावे लागले.