Breaking News

भारतीय क्रिकेटपटूचा श्रीलंकेत पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - 17 वर्षांखालील संघातील भारतीय क्रिकेटपटूचा श्रीलंकेतील हॉटेलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला. मोनाथ सोना नरेंद्र  असे त्याचे नाव असून तो गुजरातचा रहिवासी होता.पोहण्याच्या तलावात पडल्यानंतर त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला  मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल,  असे पोलिसांनी सांगितले.