Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन


मुंबई,दि.17  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वैद्यकीय शिबिर, गरजू नागरिकांना मदत, स्वच्छता अभियान यासह अन्य समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सकाळपासून मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. सकाळपासून विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. मुंबईत 30 ठिकाणी आरोग्य शिबिरे, 34 ठिकाणी डोळे तपासणी शिबिरे, 45 ठिकाणी रूग्णांना फळे व साहित्यवाटप तर, 80 हून अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत पुरवली जात आहे. नागरिकांना सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.