Breaking News

कॉपीराइट प्रकरण : राकेश रोशन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - क्रिश -3 चित्रपटाच्या स्वामित्व हक्क (कॉपीराइट) प्रकरणी चित्रपट निर्माता राकेश रोशन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राकेश रोशन यांच्या विरूद्ध उत्तराखंडच्या न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी नैनीताल उच्च न्यायालयाने राकेश रोशन यांची याचिका फेटाळून लावली होती. गेल्या वर्षी 21 मे रोजी देहराडूनचे लेखक रूपनारायण सोनकर यांनी एका स्थानिक पोलीस ठाण्यात स्वामित्व हक्क प्रकरणी राकेश रोशन यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रोशन यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला गेला होता.