Breaking News

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धवजारोहण

औरंगाबाद, दि. 16, सप्टेंबर - मराठवाडामुक्तीसंग्राम दिनानिमित्त गुरुवार, दिनांक 17सप्टेंबर रोजी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ध्वजारोहण होईल.
ध्वजारोहणाचा हा मुख्य समारंभ येथील सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ होईल. ध्वजारोहणापूर्वी सकाळी 8 वाजून 45 मिनीटांनी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पणकरण्यात येईल व मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिली जाईल. त्यानंतर ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमासाठी सर्वांनी नियोजित  वेळेच्या 30 मिनीटे अगोदर उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.