0
न्यूयॉर्क, दि. 07, सप्टेंबर - अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत नवव्या मानांकित व्हिनस विल्यम्सने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सुमारे अडीच तास  चाललेल्या सामन्यात व्हिनसने 13व्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाला 6-3, 3-6, 7-6 (7-2) असे पराभूत केले. पहिला सेट व्हिनसने तर दुसरा सेट क्विटोव्हाने  जिंकला. त्यामुळे तिस-या सेटमध्ये झुंज अधिक रंगतदार झाली. अखेर टायब्रेकरमध्ये व्हिनसने सामना जिंकला. उपांत्य फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या  बिगरमानांकित स्लोआन स्टीफन्सशी होणार आहे.

Post a Comment

 
Top