Breaking News

वाकड येथील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे, दि. 15, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वाकड, ताथवडे, पुनावळे येथे चालू असलेल्या  अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. बुधवारी केलेल्या कारवाईत नऊ बांधकामे भूईसपाट करण्यात आली.ताथवडे, पुनावळे व वाकड या परिसरात मोठ्यणात  अनधिकृत बांधकामे सुरू होती. या अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी धडक कारवाई केली. कारवाईमध्ये ताथवडे, पुनावळे व वाकड  येथील पाच आरसीसी व चार पत्राशेड अशा एकूण नऊ बांधकामावर कारवाई करण्यात आली. अभियंता मकरंद निकम यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब  ढवळे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने दोन जेसीबी, एक मशीन, तीन ट्रॅक्टर, दहा मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.