Breaking News

बँकेतील सफाई कामगाराने सात लाख लांबविले, पैसे परत, पण गुन्हा दाखल

रत्नागिरी, दि. 14, सप्टेंबर - पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथील सिंडिकेट बँकेच्या शाखेत महिला सफाई कामगाराने सात लाख रुपये लांबविले. ते पैसे तिने परत  केले. मात्र तिने चोरी केल्याने बँकेचे शाखा व्यवस्थापक अर्जुन भास्कर यांनी याबाबतची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
बँकेच्या शाखा कार्यालयातील सफाई कामगार वासंती सीताराम कांबळी यांनी गेल्या 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत बँकेतून सात  लाख रुपये लांबविले. आपली चोरी उघड होईल, म्हणून वासंती कांबळी यांनी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान व्यवस्थापकांकडे सात लाखाची ही रक्कम परत केली  होती. या चोरीबाबत व्यवस्थापक अर्जुन भास्कर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविले होते. वरिष्ठ कार्यालयाने सफाई कामगाराविरोधात तक्रार दाखल  करण्याचे आदेश दिले.त्यानुसार वासंती कांबळी यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.