Breaking News

नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे, दि. 16, सप्टेंबर - बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातली निंबाळकरवस्ती येथे  राहणा-या 40 वर्षीय नराधम बापाने पोटच्या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर राहत्या घरातच बलात्कार केला. नराधमाच्या पत्नीने तब्बल दीड वर्षानंतर याप्रकरणी  पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना 2 मार्च 2016 रोजी घडली होती. पांडुरंग नागोजी घोटणे (वय- 40) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा रिक्षा ड्रायव्हर आहे तर पिडीत मुलीची आई कंपनीत कामाला जात असे. घटनेच्या दिवशी (2 एप्रिल 2016) महिला कामावरून घरी परतली असता,  सात वर्षीय मुलगी रडताना आढळली. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार सांगितला. आरोपी घरी आल्यानंतर फिर्यादीने याबाबत विचारणा केली  असता त्याने काही ऐकून न घेता मुलीला दवाखान्यात नेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने महिला पिडीत मुलीला घेऊन दुसरीकडे राहण्यास गेली.  मागील दोन महिन्यापूर्वी फिर्यादी महिला काम करत असलेल्या ठिकाणी आरोपी आला आणि तिच्या मुलीला घेऊन जाऊ लागला. परंतू फिर्यादीने त्याला विरोध  दर्शवला. आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. फिर्यादीने घडलेेली घटना चाईल्ड हेल्प लाईनच्या सदस्यांना सांगितली. त्या सर्वांनी धीर दिल्याने महिलेने  आज अखेर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली आहे.