Breaking News

नागपुरात अवैध दारुसाठा जप्त

नागपूर, दि. 14, सप्टेंबर - उमरेड ते भंडारा पारडी आऊटर रिंगरोडवरून अवैध दारु वाहतूक करणार्‍या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.  या कारवाईत 3 लाख 75 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
उमरेड ते भंडारा पारडी आऊटर रिंग मार्गावरून एम.एच.40/ए 6592 व एमएच 31/एपी 0138 क्रमांकाच्या चारचाकीमधून अवैध दारुची वाहतूक होत असल्याच्या  माहितीवरून केलेल्या कारवाईत 2 आरोपींकडून 3 लाख 75 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी राजेश विजय जैस्वाल व राहूल जवाहर  नंदेश्‍वर यांना अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला . ही कारवाई राज्य उत्पादन विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एस.  जानराव, दुय्यम निरीक्षक ए. आर. कैकाडे, जवान आशिष वाकोडे, राहूल सपकाळ, गजानन वाकोडे, राजेश काष्टे यांनी केली.