Breaking News

पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांनी गोमांस खाण्याची इच्छा व्यक्त करु नये - अल्फान्सो कनन्नाथानमभुवनेश्‍वर,दि.8 : देशात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांनी भारतात येऊन गोमांस खाण्याची इच्छा व्यक्त करु नये. त्यांनी आपल्या देशातच गोमांस खाऊ यावे, असे वक्तव्य पर्यटनमंत्री अल्फान्सो कनन्नाथानम यांनी केले. ओडिशामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अल्फान्सो कनन्नाथनम केरळ 1979 च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.